शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा धोका वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या उपाययोजना प्रशासन करत असले तरी दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जनता हवालदील झाली आहे.
दिवसेंदिवस ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिला आहे.
माढा तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती…
आता पर्यंत एकुण रूग्ण – 5278
बरे होऊन घरी परतलेले रूग्ण – 4668
सध्या उपचार घेत असलेले रूग्ण-470
यामधील होम काॅरंटाईन रूग्ण – 280
कुर्डुवाडी येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रूग्ण – 85
तर इतर रूग्णालयात उपचार घेत असलेले 105 रूग्ण आहेत. तर आतापर्यंत माढा तालुक्यातील 140 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात वाढता प्रादुर्भाव होत असल्याने लाॅकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे .त्यामुळे नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता कोरोना टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, व सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी थोरात यांनी केले आहे