जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू झाले आदेश ; वाचा सविस्तर

सोलापूर,दि.५ : सोलापूर जिल्ह्यातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत. सुधारित आदेशानुसार सोलापूर शहर हद्द वगळून ३० एप्रिलपर्यंत आदेश काढले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद्द वगळून ) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील कोव्हीड -१९ चे मोठया प्रमाणात वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक सूचना / आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
१ ) फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी लागू करणे : a ) संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ( पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद्द वगळून ) फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ लागू करण्यात येत आहे . b ) सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते रात्री ०८.०० वा . पर्यंत ५ पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही किंवा एकत्र फिरता येणार नाही . c ) उर्वरीत कालावधीमध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० वा . पर्यंत आणि पुढे शुक्रवारी रात्री ०८.०० ते सोमवारी सकाळी ०७.०० वा . पर्यंत कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वैध कारणाशिवाय किंवा परवानगी शिवाय खालील दिलेल्या कारणाव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास बंदी आहे. d ) वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात येत असून त्या नियमित कार्यरत राहतील. e ) अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या बाबी समाविष्ट असतील. : a ) हॉस्पीटल, डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनीक, वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये, फार्मसी, फार्मसी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. b ) किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, खाद्य पदार्थांची दुकाने. c ) सार्वजनिक वाहतूक : – रेल्वे , टॅक्सी , ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस. d ) विविध देशांच्या राजदुतांची कार्यालयांशी संबंधीत सेवा. c ) स्थानिक प्रशासनामार्फत करावयाची मान्सून पूर्व कामे, ) स्थानिक प्रशासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. g ) मालवाहतूक h ) कृषी निगडीत सेवा i ) ई – कॉमर्स. j ) प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी, k ) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या इतर सेवा. २ ) घराबाहेरील उपक्रम : a ) सर्व बागा / सार्वजनिक मैदाने / बीच रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० वा . पर्यंत सोमवार ते शुक्रवार या आठवड्याच्या दिवशी बंद राहतील आणि शुक्रवारी रात्री ०८.०० पासून सोमवारी सकाळी ०७.०० वा. पर्यंत बंद राहतील. b ) सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते रात्री ०८.०० या वेळेत उपरोक्त ठिकाणी भेट देणाऱ्या व्यक्तींनी कोव्हीड -१९ बाबत योग्य वर्तन करुन सक्त काळजी घ्यावी.

c. विद्युत पुरवठयाशी संबंधीत कंपन्या . d . टेलिफोन सेवा देणान्या आस्थापना . e. इन्श्युरन्स / मेडिक्लेम कंपन्या. f. औषधांचे उत्पादनाचे व्यवस्थापन / वितरण करणाऱ्या फार्मास्युटिकल कंपन्यांची कार्यालये, b ) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यामध्ये आवश्यकता अपवाद असल्यास अधिकचे निर्देश देऊ शकेल. b ) सरकारी कार्यालये त्यांच्या क्षमतेच्या ५० % इतक्या उपस्थितीत चालू राहतील. तथापि कोव्हीड -१९ संदर्भात आवश्यक असलेले मनुष्यबळ १०० % इतक्या क्षमतेने संबंधित कार्यालयाचे कार्यालय प्रमुखाच्या निर्णयावर चालू ठेवण्यात यावे ८ ) विद्युत, पाणी पुरवठा आणि बँकींग, फायनान्स सहीसेस संदर्भातील सर्व सरकारी कार्यालये तसेच सरकारी कंपन्या त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. d ) सरकारी कंपन्या तसेच सरकारी कार्यालयांच्या बाबतीतील सर्व बैठका त्या कार्यालयात उपस्थित असलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्या व्यतिरिक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जातील. e ) सरकारी कार्यालयामध्ये तसेच सरकारी कंपन्यांमध्ये अभ्यागतांना येण्यास परवानगी नसेल. तसेच सर्व कार्यालयांनी लवकरात लवकर ई – व्हिजीटर सिस्टीम लवकरात लवकर चालू करावी. 1 ) सरकारी कार्यालयामध्ये येण्याची अत्यावश्यकता भासल्यास कार्यालय प्रमुखांनी अभ्यागतांसाठी मागील ४८ तासांचा Negative RTPCR अहवाल असल्यास पास देण्याची व्यवस्था करावी . g ) सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांनी भारत सरकारच्या निकषानुसार लवकरात लवकर कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे . जेणे करुन कोव्हीड -१९ चा प्रसाराची भिती संपून तातडीने कार्यालये शासनास पुन्हा उघडता येतील. ६ ) खाजगी वाहतूक : खाजगी बसेससह खाजगी वाहतूक सामान्यपणे सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते रात्री ०८.०० वा . पर्यंत चालू राहील. आणि अत्यावश्यक किंवा तातडीच्या सेवेसाठी इतर वेळी चालू राहील ( शनिवारी व रविवारी रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० आणि शुक्रवारी रात्री ०८.०० वा . पासून सोमवारी सकाळी ०७.०० वा . पर्यंत. ) खाजगी बससेवा उपरोक्त निर्देशासह खालील अटीवर चालू राहील. a. फक्त बसण्याच्या आसन क्षमतेनुसार बस वाहतूक चालू राहील. तथापि, प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. b. खाजगी बस सेवा देणाऱ्या स्टाफने भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण करुन घ्यावे. आणि जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत कोरोना निगेटिव्ह असलेबाबत १५ दिवसांसाठी वैध असलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. सदरचा आदेश दिनांक १० एप्रिल , २०२१ पासून लागू असेल. ७ ) करमणूक आणि मनोरंजन : a ) सिनेमाहॉल पूर्णपणे बंद राहतील . b ) नाटयगृहे आणि सभागृहे पूर्णपणे बंद राहतील. ८ ) मनोरंजन पार्क आर्केडस् / व्हीडीओ गेम पार्लर पूर्णपणे बंद राहतील. d ) वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहतील. e ) क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा , आणि क्रिडा संकुले पुर्णपणे बंद राहतील. उपरोक्त आस्थापनाशी संबंधीत सर्व व्यक्तींनी लवकरात लवकर भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण करुन घ्यावे. जेणे करुन कोव्हीड -१९ चा प्रसाराची भिती कमी होऊन सदर संकुले लवकरात लवकर उघडता येतील. g ) चित्रपटांचे / सिरीयल / जाहिरातीचे चित्रीकरण खालील अर्टीवर करण्यात यावे. a. सामान्यपणे मोठयाप्रमाणात कलाकर एकत्र येऊन चित्रीकरण करणे टाळावे. b. कलाकारांसहीत सदर चित्रीकरणासाठी असणारा स्टाफ यांचेकडे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत कोरोना निगेटिव्ह असलेबाबत १५ दिवसांसाठी वैध असलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. सदरचा आदेश दि.१० एप्रिल, २०२१ पासून लागू असेल.