Big9news Network
सोलापूर शहरातील नागरिकांना त्यांनी नोंदणी केलेल्या तारखेलाच कोरोना प्रतिबंधक लस (corona Vaccine)मिळेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संचारबंदीमुळे महानगरपालिका (Solapur Municipal Corporation) कार्यक्षेत्रातील कोविड १९ लसीकरण लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या ऑफलाइन नोंदणी बंद झाली असुन आँनलाइन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. काही लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोससाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे व ज्यांना जे सेंटर, दिनांक, वेळ मोबाईलवर प्राप्त झालेली आहे, त्यांनी त्याच दिवशी लसीकरण करून घ्यावे असेही महापालिकेने आवाहन केले आहे.
मोबाईलवर ठरवुन दिलेल्या तारखेला वेळेवर नागरिकांनी आपल्या केंद्रावर उपस्थित न राहिल्यास ते लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे असेही महापालिकेने म्हटले आहे. ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोणतीही भिती न बाळगता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असेही आवाहन केले आहे.
Leave a Reply