तो एक समर्थ | मंदिर समितीच्या वतीने निराधार, गरजूंना भोजन

Big9news Network

कोरोना लॉकडाऊनच्या संकटात सापडलेल्या शहरातील निराधार व गरजू नागरिकांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून रॉबीनहूड आर्मीच्या (Robinhood Army)सहकार्याने चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षीही भोजन वाटपाची सुरूवात करत देवस्थानने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.  या उपक्रमात देवस्थानकडून भोजन बनवून ते अक्कलकोट (Akkalkot) शहरातील निराधार व गरजू नागरिकांपर्यत दररोज पोहोचविण्याचे काम रॉबीनहूड आर्मीच्या माध्यमातून होत आहे. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी गेल्यावर्षीपासून जगभरासह आपल्या देशावर विशेषता महाराष्ट्रात  कोरोना संसर्गाचे मोठे सावट आहे.

सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत देवस्थानकडून गतवर्षीही पोलीस कर्मचारी, आरोग्य यंत्रणा कर्मचारी, नगरपालीका सफाई कर्मचारी, परप्रांतीय मजूर, भटक्या जाती जमातीचे लोक या सर्वांना अनेक दिवस देवस्थानकडून जेवणाची, व चहा नाष्टयाची सोय करण्यात आली होती. याचीच पुनरावृत्ती करत यंदाही रॉबीन हुड आर्मिच्या सहकार्याने लॉक डाऊनमध्ये निराधार व गरजू लोकांना भोजन वाटप करून देवस्थानने अन्नदान सेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यास संतोष पराणे, रॉबीनहूड आर्मीचे देविदास गवंडी, श्रीधर गुरव, श्रीशैल गवंडी, मल्लीनाथ माळी, आशिष हुंबे, अनंत क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर व अन्य सदस्य परिश्रम घेत आहेत.


फोटो ओळ – वटवृक्ष देवस्थानकडून निराधार व गरजूंना भोजन वाटप करताना अविनाश क्षीरसागर, आशिष हुंबे व अन्य पदाकधिकारी दिसत आहेत.