Big news Network
सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. काल शुक्रवारी शहरातील विविध भागातील जवळपास 30 पेक्षा जास्त रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे व रिक्षाचालकांना पाचशे रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली
ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली तसेच आज (शनिवारपासून) शहरात विनाकारण बाहेर फिरणारे व नियमांचे पालन नकरणाऱ्यांवर जागेवरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी दिली
शुक्रवारी शहर गुन्हे शाखेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये विनाकारण फिरणाऱ्या 72 जणांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 171 जणांवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून जवळपास 75 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, यामध्ये होटगी रोडवर कोरोना ची तपासणी न करता, कोरोनाची लस न घेता आणि कोरोनाची चाचणी न करता रिक्षा चालवणारे, दोन पेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे व दुचाकीवर डबलसीट विनाकारण फिरणारे अशा सर्वांवर पोलीस कारवाई करण्यात आली.
Leave a Reply