Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा, एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 14 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

 

सोलापूर शहरात आज मंगळवारी दि.20 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 370 रुग्ण आढळले असून यामध्ये 222 पुरुष तर 148 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 2908 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2538 निगेटीव्ह तर 370 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 312 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 14 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *