BIG 9 NEWS NETWORK
शेखर म्हेञे माढा प्रतिनिधी: महाराष्ट्रात कोरोणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असून राज्यात रक्ताचा पुरवठा कमी असल्याचे काही दिवसांपूर्वीच शासनाने जाहीर केले होते. त्याच बरोबर शासनाने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन देखील केले होते त्या पार्श्वभूमीवर,आज माढा शहरातील जगदंबा गणेश मंडळ शिवाजीनगर यांनी भव्य रक्तदानाचे मित्र प्रेम हॉस्पिटल (गुड शेफर्ड) येथे आयोजन केले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. विकास मस्के व 25 वेळा रक्तदान करणाऱे सत्तार मुलाणी यांच्या हस्ते श्री गणेशाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले. जगदंबा मंडळाने गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या काळात रक्तदानाचे आयोजन केले होते. रक्तदान करण्यास आलेल्या रक्तदात्यांची मंडळाकडून काळजी घेतली गेली प्रत्येक वेळेस बेड सॅनिटायझर करण्यात येत होते, या शिबिरात महिलांनी देखील रक्तदान केले यावेळी मंडळाचे आधारस्तंभ गणेश साळुंके, तुकाराम शिंदे, मधुसुधन गायकवाड, धैर्यशील भांगे, नागेश खेडकर, अनिल हणमे , रमेश थोरात, काका मुळे, शंभू कदम, सौरभ साळुंखे, मुकेश साळुंके, राम तात्या शिंदे, धनाजी सर्जेराव, बापु साळुंखे, विशाल ढावरे, किरण कदम, रोहिदास कदम, बंडु पवार, अविनाश भोसले, विवेक मुळे, अवधुत साळुंखे, दुर्गेश साळुंखे,आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.मंडळाचे सर्वेसर्वा गणेश साळुंखे यांनी रक्तदाते व सोलापूर सिव्हील हाॅस्पीटल रक्तपेढी च्या सर्व टिमचे आभार मानले.
Leave a Reply