Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे आज एकाच दिवशी 181 जणांची नोंद घेण्यात आली दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 437 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून वीस जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.29 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 181 रुग्ण आढळले असून यामध्ये 104 पुरुष तर 77 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 2518 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1960 निगेटीव्ह तर 181 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 437 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

कोरोनामुळे आज 21 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *