धक्कादायक | हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला अटक… वाचा सविस्तर

Big 9 News Network

मल्ल सागर राणा याच्या हत्येप्रकरणी दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार याला अखेर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. सुशीलसोबत त्याचा सहकारी आणि खासगी सचिव अजय बक्करवाला यालाही दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांना मुंडका परिसरातून अटक करण्यात आली. येथील न्यायालयाने सुशील कुमारला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ‘२३ वर्षीय सागर राणाच्या हत्येप्रकरणी सुशील आणि अजय यांना रविवारी सकाळी दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक करण्यात आली.’