Big9news Network
आज दि.10 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 363 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.
आज गुरुवारी 10 जून रोजी ग्रामीण भागातील 363 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 205 पुरुष तर 158 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 389 आहे. यामध्ये 228 पुरुष तर 161 महिलांचा समावेश होतो. आज 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 12,964 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 12,601 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Leave a Reply