पशुचिकित्सकांना नोंदणीकृत व्यवसाय परवाना द्या.

सोलापूर दिनांक – शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा अत्यंत जवळचा घरचा डॉक्टर म्हणजे ग्रामीण भागातील पशुचिकित्सक होय.यांच्या न्याय हक्काच्या मागण्या सरकारने तातडीने लक्षात घेऊन हस्तक्षेप करावे कारण सरकारच्या दुर्लक्षतेमुळे हा वर्ग वर्षानुवर्षे उपेक्षित आहे. हे अत्यंत गंभीर आहे. या आंदोलनाला सिटू चा जाहीर पाठिंबा असून याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात राज्यव्यापी लक्षवेधी व आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा अँड.एम.एच.शेख यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशु संवर्धन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले एक हजार पशुचिकित्सक दुग्ध व पशुसंवर्धन क्षेत्राशी असंघटीत रित्या ग्रामीण भागात पशुधन आरोग्याच्या निगडीत सेवा बजावत आहेत.

खाजगीरित्या असंघटीत क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायदा अन्वये 1984 / 30 ख नुसार किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशु वैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्टरच्या सुपरव्हिजन व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून काम करतात.अशा सर्व पदवीधारक पशुचिकित्सकांना आपल्या जिल्हा पशुसंवर्धन विभाग तसेच मा.उपायुक्त पशुसंवर्धन यांच्याकडून नोंदणी होऊन कामाची सूची तयार करून ओळखपत्र देण्यात यावे.तसेच महाराष्ट्र राज्य सरकार च्या अखत्यारीत मधून पशुसंवर्धन पदवीधारकांचे राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररित्या औषधे बाळगणे व नोंदनीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्य सरकारच्या पशुधन पर्यवेक्षकांच्या विविध मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात.राज्यातील रिक्तपशुधन पर्यवेक्षक पदाची तात्काळ भरती करण्यात यावी.अशी भूमिका संघटनेचे जिल्हा सचिव डॉ.शिवानंद झळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी दुपारी 1 वाजता सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स चे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली सिटू संलग्न सोलापूर पशुचिकित्सक कर्मचारी संघटनेची विविध न्याय हक्काच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या संदर्भात बैठक पार पडली.

यावेळी शिष्टमंडळाद्वारे मा.जिल्हाधिकारी कार्यालय मा.जिल्हाधिकारी चिटणीस श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात पशुचिकित्सक दत्तात्रय माने,शिवानंद झळके,सावळाराम कोल्हारकर, किरण माने, आनंद रुपनर आदी उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर किसान सभेचे सिध्दप्पा कलशेट्टी, डी.आर.राऊत, पशुचिकित्सक ज्ञानेश्वर चव्हाण, दत्तात्रय माने,आनंद रूपनर,विनायक बचुटे, विनायककुमार कांबळे, रणजित देशमुख, तात्यासाहेब व्हनमाने,सावळाराम कोल्हारकर,रियाज मुजावर व युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम आदी उपस्थित होते.