Big9news Network
भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 6व्या पुण्यतिथी निमित्त ड्रीम फौंडेशन व चाणक्य गुरुकुल तर्फे युवा जागर अभियान व डॉ.कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प.पू. श्री.महांतेश स्वामीजी तद्देवादी मठ यांच्या अध्यक्षतेखाली व मा.दीपक अरवे सहाय्यक आयुक्त सीआयडी, राज्य कर निरीक्षक सचिन जाधवर, प्रा.मीरा शेंडगे, सौ.चंद्रिका चव्हाण, संयोजक काशिनाथ भतगुणकी, संगिता भतगुणकी यांच्या हस्ते या पुरस्काराने मोशन फिल्म स्टुडीओचे युवा दिग्दर्शक आणि चित्रपट संकलक सचिन जगताप यांना सन्मानित करण्यात आले…
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, डॉ, कलाम यांचे ग्रंथ व रोप असे पुरस्कार स्वरूप होते.
मोशन फिल्म स्टुडिओ च्या माध्यमातून चित्रपट संकलन, दिग्दर्शन, लघुपट आणि माहितीपट यांची निर्मिती, अनेकविध विषयांवर सामजिक कार्य आणि प्रबोधनपर जाहिराती, या सर्वच आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सचिन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सचिन बोलताना म्हणतात कि, ”आपल्या कार्याचं कौतुक व्हावं, त्याची दखल घेतली जावी, यासारखा दुसरा आनंद तो कोणता? कारण प्रत्येक पुरस्कार, हा आपल्याला, आपण केलेल्या कार्याची पोचपावती देतो आणि आयुष्यात पुढे नव नवीन कार्य करण्याची ऊर्जा देतो.”
Leave a Reply