Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

बहु चर्चेचा आणि अनेक दिग्गज राजकारण्यांनी आडाखे बांधून ठेवलेल्या महापालिका निवडणुकीची रचना आज जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील आगामी महापालिका निवडणुका सिंगल वार्ड रचनेनुसार होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात आदेश काढले असून मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी, चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड, वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सन 2022 मध्ये मुदतीत संपणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत करता प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

यादी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती. त्यात भाजपला मोठे यश मिळाले होते. सध्याच्या ठाकरे सरकारने 31 डिसेंबर 2019 रोजी राज्य शासनाने राज्यातील महापालिकांमधील बहुसदस्य पद्धत बंद करून एक सिंगल प्रभाग पद्धतीचा कायदा केला, त्यावरून मतभेद होते. राष्ट्रवादी काँग्रेसची यासंदर्भात वेगळी भूमिका होती मुंबईसाठी फक्त एक सदस्य वॉर्ड पद्धती ठेवावी आणि इतरत्र ते दोनची असावी मात्र त्यासाठी कायद्यात पुन्हा दुरुस्ती करावी लागणार होती मात्र त्यावर एकमत न झाल्याने सिंगल वॉर्ड असणार आहे.

प्रभागाचे प्रारूप रचनाचे काम 27 ऑगस्टपासून हाती घेण्यात यावे तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असेही आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *