Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

महाराष्ट्रात ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी (मुस्लिम व जैनधर्मियांसह) ह्या सर्व जातीसह एकूण ओबीसीची लोकसंख्येची टक्केवारी फक्त 34 टक्केच्या जवळपास असतांनाही, महाराष्ट्रातील ओबीसी नेते हे, जनतेची जाणीवपूर्वक दिशाभूल करून, राज्यात 54 टक्के ओबीसी समाज असल्याची खोटी माहिती सांगून अफवा पसरवीत आहेत. त्यामुळे दि. 31 ऑगस्ट 2021 रोजी, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या ओबीसींचा महामेळाव्यास परवानगी देवू नये. राजकीय दबावाखाली ओबीसी महामेळाव्यास परवानगी दिल्यास ओबीसी नेत्यांचे अफवा पसरविणारी माहिती खोडून काढण्यासाठी, राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने चार हुतात्मा पुतळा चौकात ओबीसीच्या जातनिहाय लोकसंख्येची वस्तुनिष्ठ व खरी माहिती देणारा डिजिटल बोर्ड बसविण्यास परवानगी देण्याची मागणी छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांचेकडे निवेदनाव्दारे केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की…

सत्तेत सहभागी असणारे विजय वडेट्टीवार, छगन भूजबळ सारख्ये ओबीसी नेते राज्यात 54 टक्के ओबीसी समाज असल्याची खोटी माहिती देवून अफवा पसरवित आहेत. तसेच मराठा समाजाविषयी सातत्याने चुकीचे भाष्य करून मराठा विरुध्द ओबीसी असा संघर्ष निर्माण करण्याचे कटकारस्थान ओबीसी नेते करीत आहेत. तसेच कोविडमुळे जनजीवन विस्कळीत असताना ओबीसी महामेळाव्यास परवानगी दिल्यास कोविड संसर्गात वाढ होईल. त्यामुळे खोटी माहिती सांगून, अफवा पसरविणार्‍या ओबीसी महामेळाव्यास परवानगी देवू नये. सातत्याने खोटी माहिती सांगून अफवा पसरवून भडकाऊ भाषणे करणार्‍या ओबीसी नेत्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी योगेश पवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *