बारामती | बंद वीज पुरवठा एक रुपयाही न भरता संघटनेने केला सुरू

Big9news Network

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे डीपी बंद करण्याचा सपाटा लावला असून त्या विरोधात रघूनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांकडे महावितरण कंपनीचे एक रूपयाही देणे लागत नसल्याने बंद केलेले डीपी स्वत:च सुरू करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भुमिका घेतली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बारामती मतदारसंघातील देऊळगाव रसाळ येथील महावितरण कंपनीने बंद केलेला विद्युत पुरवठा शेतकरी संघटनेच्या उपस्थितीत चालु केला..तसेच गावांमध्ये शेतकरी संघटनेची शाखा उद्घाटन करण्यात आले,त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते मा.शिवाजीनाना नांदखिले,राज्य प्रवक्ते मा.अशोकराव खलाटे, पुणे जिल्हाध्यक्ष मा. पांडुरंग रायते, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष.हनुमंत वीर आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.त्यावेळी बारामती तालुका शेतकरी संघटना अध्यक्षपदी.पंढरीनाथ रसाळ यांची निवड करण्यात आली.

शेतकरी संघटनेच्या या भुमिकेचे अनुकरण राज्यभरातील शेतकऱ्यांनी करावे . शेतकरी महावितरणचे देणे लागत नसून उलट महावितरण कंपनीकडून येणे लागत असल्याने शेतकऱ्यांनी आपले बंद असलेले डीपी स्वत:च सुरू करावेत असे आवाहन पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केले आहे