Breaking | भाजपचे उपमहापौर राजेश काळे तडीपार

Big9news Network

भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे महापालिकेत वादग्रस्त ठरलेले राजेश काळे यांना पक्षाने निलंबित केले होते.

राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर, उस्मानाबाद ,इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर, उस्मानाबाद इंदापूर येथून तडीपार करण्यात आला आहे. त्यांच्यावर खून, खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

चेतन गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र आहेत. तर उपमहापौर राजेश काळे भारतीय जनता पार्टीचे निलंबित कार्यकर्ते आहेत.

सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य आणि अश्‍लील भाषेत राजेश काळे यांनी शिवीगाळ केली होती त्या प्रकरणी पोलिसांनी अटक सुद्धा केलेली होती हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

महापालिकेत आर.के या नावाने त्यांना ओळखले जाते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर काळे यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत मनपा पदाधिकाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.

याबाबत उपमहापौर राजेश काळे यांच्याशी संपर्क साधला असता राजकीय द्वेषापोटी माझ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. या तडीपारीला न्यायालयातून आव्हान देणार आहे.अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतूने राजकीय पदाचा गैरवापर करुन नियमबाहय पध्दतीने काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरीक व व्यावसायीकांना धमकावून पैशाची मागणी करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरीकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कर्मचारी काम करीत असतानासुध्दा धाकदपटशा दाखवण्याच्या उद्देशाने त्याने सरकारी काम करु नये याकरीता अंगावर जाणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर नोंद करण्यात आले आहेत.

राजेश दिलीप काळे, वय ४५ वर्षे, रा. फ्लॅट क्र. १०१, गॅलक्सी अपार्टमेंट, विरशैव नगर, जुळे सोलापूर यांना सोलापूर शहर, जिल्हा पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.

डॉ. वैशाली कडुकर                                                               पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ)