विकास होणार कधी..? प्रशासनचं करतोय अडथळा निर्माण – सोलापूर विकास मंच

Big9news Network

होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने रंगभवन चौकातील समाज कल्याण केंद्र हॉल येथे सर्व सोलापूरकरांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हॉलचे रितसर आगाऊ बुकींग असूनही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावा वरुन हॉल व्यवस्थापकाने हॉल उघडण्यास आणि बैठकीस आक्षेप नोंदविला. सोलापूरतील एकुण ४७ संस्था, संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांच्या अध्यक्षांचा ह्या निंदनीय आणि अशोभनीय प्रकारामुळे अपमान झाला असून, सोलापूर विकास मंचच्या वतीने त्याच ठिकाणी हॉलच्या आवारात निषेध नोंदवत बैठक पूर्ण केली.

 

सोलापूरच्या विकासात जाणिवपुर्वक अडथळा निर्माण करुन शहर भकास करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून, ह्या विरोधात सोलापूरकरांच्या तीव्र भावना सर्वत्र व्यक्त केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्या दडपणशाही विरोधात येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या पावित्र्यात सर्वसामान्य नागरिक असून त्यांच्या तीव्र भावनांचा आदर जिल्हा प्रशासनाने करावा असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सर्व सोयींनीयुक्त असलेल्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याच्या को जनरेशन अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार्‍या दफ्तर दिरंगाईबद्दल नाराजीचा सूर सर्वत्र व्यक्त होत असून त्याचे पर्यावसन येणाऱ्या काळात मोठय़ा जनउद्रेकात होऊ शकतो असे उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेल्या विचारांवरुन लक्षात येते. सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नगर विकास विभागच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करुन अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडुन टाकावी असे सदर बैठकीत ठरले. बैठकी मध्ये सोलापूर विकास मंचचे केतन शहा, श्रीनिवास वैद्य, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, अॅड. खतीब वकील, आनंद पाटील, अनंत कुलकर्णी, विजय कुंदन जाधव, डॉ. सुदिप सारडा, प्रतिक खंडागळे, यशपाल चितापुरे, अरविंद रंगा, निरंजन कलबुर्गी, रोहित कल्लशेट्टी, आर्यन कांबळे, सुर्यकांत पारेकर, रविंद्र कोळी, महेश चिंचोळी, रमेश भोसले, बाळकृष्ण अवधुत, भास्कर एस., चंद्रकांत ईश्वरकट्टी, प्रसन्न नाझरे, सतीश डी., सचिन पत्तेवार, जावेद अत्तार, कुंदाराम बी.एम., अजित खजिनदार, राहुल वनारसे, बि.एम.कुंदाराम, राम दुधभाते आणि सोलापूरच्या विविध संस्था आणि संघटनेचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते.