माढा | नगरपंचायत निवडणुकीसाठी 77.35 टक्के मतदान

Big9news Network

  • 7234 पैकी 5596 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी: –

माढा नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागेसाठी आज मतदान झाले.या निवडणुकीमध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना , रा स प व संभाजी ब्रिगेड यांनी स्वबळावर निवडणूक लढवली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी देखील माढा नगरपंचायत साठी राष्ट्रवादी ,काँग्रेस ,व शिवसेना यांनी स्वबळावर उमेदवार उभा केले होते त्यामुळे माढा नगरपंचायत ची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. काही प्रभागात दुरंगी, तिरंगी तसेच चौरंगी लढती झाल्या ओ.बी.सी.आरक्षणामुळे रद्द झालेल्या चार प्रभागासाठी येत्या 18 जानेवारीला निवडणुक होत आहे त्यानंतर 19 जानेवारीला मतमोजणी झाल्यावरच नगरपंचायतच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होईल. निकाल लांबणीवर पडल्याने नागरिकांमध्ये निकालाची उत्सुकता लागली आहे.

प्रभाग निहाय झालेले मतदान पुढिलप्रमाणे –

प्रभाग एक – 536/468 (87.31), प्रभाग दोन – 496/384 ( 77.41) . प्रभाग तीन – 488/399 ( 81.76). प्रभाग चार – 553/430 (77.76). प्रभाग सहा – 592/459 (77.53). प्रभाग आठ – 622/473 (76.04) . प्रभाग दहा – 646/478 (73.99). प्रभाग अकरा – 687/450 (78.60) . प्रभाग बारा – 530/405 (76.41). प्रभाग तेरा – 519/392 (75.53 ). प्रभाग पंधरा – 517/394 (76.21). प्रभाग सोळा – 626/472 (75.40). प्रभाग सतरा – 422/302 (71.56) .

माढा नगरपंचायत निवडणुकीत दरम्यान माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही निवडणूक सुरळीत पार पडली.