Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

Big9news Network

दुकानात हॉटेलमध्ये, रस्त्यावरील गाड्यावर खाद्यपदार्थ खायला देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर होताना दिसून येतो. मात्र अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही, कारण वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या शाईत केमिकल असते आणि ते केमिकल धोकायदायक असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत नवीन आदेश काढले आहेत. त्यामुळे आता असे पदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्र वापरण्याचे सोडून द्यावे लागणार आहे.

डायआयब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाईल या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करण्यास सुचवले जाते. ही शाई पोटात गेल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो. या केमिकलमुळे अनेक पोटाचे विकारही जडू शकतात. आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नवे आदेश काढले आहेत, त्यामध्ये त्यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे.

हॉटेलचालकांनी, दुकानदारांनी याचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. आपल्याकडे पोहे, वडे, भजी यासारखे अनेक गरम पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्रात बांधून दिले जातात, मात्र त्यातले केमिकल आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. याबाबतची धोक्याची सूचना फूड, सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया यांनीही याआधीच दिली आहे. त्यामुळे या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री प्रदीपकुमार राऊत यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *