तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्त्याला मंजुरी; आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

Big9news Network

उत्तर तालुक्यातील तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्ता ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण  योजनेंतर्गत मंजूर झाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे.


तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्ता अत्यंत खराब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले होते. अनेकवेळा या रस्त्यावर किरकोळ अपघातही झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार देशमुख यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याचे  मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याची मागणी  केली होती. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले आहे.  तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्ता ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण योजनेंतर्गत मंजूर झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी पत्राद्वारे आमदार देशमुख यांना कळवले आहे.