Big9news Network
सोलापूर-विजयपूर महामार्गावरील ब्रीजला कारची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे. कवठेजवळ बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
अरुण कुमार लक्ष्मण वय 21, महिबूब मोहम्मद अली मुल्ला वय 18, फिरोज सैफसाब शेख वय 20 , मुन्ना केंभावे वय 21, सर्व राहणार यरकल केंडी, तालुका सिंदगी, जिल्हा विजयपूर, कर्नाटक अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
अरुण कुमार लक्ष्मण व इतर जखमी हे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास कारमध्ये बसून विजयपूर ते सोलापूर नवीन महामार्गावरून सोलापूरकडे येत होते. पहाटे चारच्या सुमारास विजयपूर महामार्गावरील नवीन कवठे बायपास हायबे ब्रीजला कारची धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील सर्व जण गंभीर जखमी झाले. त्यातील चौघे ठार झाले व एक गंभीर जखमी आहे.
पाचजण सिंदगी ते पुणे जात होते. कवठा बायपास हायवे ब्रिजला गाडी जाऊन धडक दिल्याने हा अपघात झाला व त्यात चारजण ठार झाले व एक जखमी आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत.
Leave a Reply