Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

संपूर्ण राज्याचे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीकडे लागले होते. कोरोना रोखण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. कडक निर्बंध लागू होणार की लॉकडाऊन यासंदर्भात नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू होती.

सद्यस्थितीत मुंबई नवी मुंबई ठाणे त्यानंतर पुणे या भागातील प्राथमिक शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले होते.

राज्यातील नवीन कोरोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेण्याबाबत बैठक आज झाली. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित यंत्रणांना केल्या.

कोरोना रोखण्यासाठी दिल्या सूचना –

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे,ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी.सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, याची दक्षता घ्यावी. तसंच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. आरोग्य यंत्रणेनं सज्ज रहावं, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयानं काम करावं. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या बैठकीत दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *