हृदयद्रावक घटना | शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू

Big9news Network

सोलापुरात आज एक दुर्दैवी घटना घडली असून उत्तर सोलापूर येथील मार्डी येथे शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर सोलापूर येथील मार्डी या गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यास गेलेल्या तीन मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांची नावे –
१)सानिका सोनार (अंदाजे वय वर्षं १७)
२)पुजा सोनार (अंदाजे वय वर्षे १३)
३)आकांक्षा युवराज वडजे (अंदाजे वय वर्षे ११)

यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून घटनास्थळी मृतांचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

पाण्यात बुडून एकाच वेळी तीन मुलींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात आहे की घातपात याबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.