Big9News Network
करमाळा । कपाटाची स्वच्छता करताना मोलकरणीने त्यातील रोकड व तीन लाख ४३ हजारांचे दागिने लांबविले. १२ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत केम येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी मोलकरणीविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शालन अडगळे (रा. रोपळे, ता. माढा) असे गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीचे नाव आहे. ५० हजारांच्या रोकडसह सोने व हिऱ्याचे मंगळसूत्र, कानातील रिंग्ज, मनगटी घड्याळ असा तीन लाख ४३ हजारांचा ऐवज असलेली छोटी पर्स एका पिशवीत कपाटावर ठेवले होते. ते गायब झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Leave a Reply