Latest Post

शिवसंग्राम संघटना आणि मराठा समाजाचे आक्रमक आणि अभ्यासू नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. अपघातानंतर तब्बल दोन तास पूर्ण आहे का उपलब्ध झाली नाही त्यामुळे या घटनेची चौकशी करावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी ते जात होते त्यादरम्यान त्यांचा अपघात झाला .या अपघाताची संपूर्ण चौकशी होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. तर या घटनेमागील सत्य समोर यावं असे मराठा समाजाचे नेते  आबासाहेब पाटील यांनी मागणी केली आहे .

नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले अशी माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,सुप्रिया सुळे, मुंडे, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस,बावनकुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *