Big 9 News Network
सोलापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग 65 वर नेहमी अपघात होत असतात ,अपघातामधील जखमी हे उपचारा आभावी दगावतात. जखमींना वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात म्हणून “मृत्युंजय दुता “बरोबरच नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून अपघातग्रस्त जखमींना प्रथमोपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. असे मत महामार्ग पोलीस केंद्र पाकणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार लठ्ठे यांनी व्यक्त केले.
जखमींना वेळेत हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील अर्जुंनसोंड (पाटी )येथे नेमण्यात आलेले मृत्युंजय दूत महादेव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी महामार्ग 65 च्या वतीने स्ट्रेचर देण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना लट्टे हे बोलत होते.
महामार्ग पोलीस केंद्र पाकणीचे वतीने भुषणकमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक ( वाहतुक), मुंबई, म. राज्य यांच्या संकल्पनेतील’ हायवे मृत्युंजय दुत’ या उपक्रम अंतर्गत सदर ठिकाणी रोडवर असलेले राजे भोसले कृषी उद्योग समुह चे मालक तथा हायवे मृत्युंजय दुत महादेव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांना स्ट्रेचर वाटप करून अपघातातील जखमींना तात्काळ मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले . यावेळी म.पो.केंद्र पाकणीचे प्रभारी सपोनि सय्यद, .हे.कॉ. पन्हाळकर, पो.ना.माने, पवार आदीसह अर्जुनसोंड (पाटी) येथील नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply