मंगळवारी सोलापुरात जनवात्सल्य बंगल्यावर काँग्रेस स्थापना दिवसानिमित्त शहर युवक काँग्रेस पदाधिकारी व होणारे नुतन शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जुन्या व नवीन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब याची भेट घेऊन येणार्या महानगरपालिका निवडणुकीत युवक काँग्रेस जोमाने कामाला लागा व तुम्ही प्रामाणिक काम करा असा कानमंत्र दिला.
यावेळी शहर युवक काँग्रेस भावी नुतन अध्यक्ष व विद्यार्थी काँग्रेस NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे ,नगरसेवक विनोद भोसले,अंबादास करगुळे,सुमीत भोसले,राहुल वर्धा,सैफन शेख, प्रवीण जाधव,मनोज कुलकर्णी,तिरूपती परकिपंडला,राजासाब शेख,विवेक कन्ना,वाहिद विजापुरे,महेश लोंढे,सुशीलकुमार म्हेत्रे,श्रीकांत वाडेकर,शुभम माने,रोहन साठे,प्रतीक आबुटे,सचिन मानवी,सचिन वेर्णेकर,शरद गुमटे,राजेंन्द्र कांबळे,दयानंद जाधव व आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.
सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या निवडणूक झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेब हे सोलापुरात आल्यानंतर नगरसेवक विनोद भोसले व गणेश डोंगरे यांना निरोप देऊन सर्व होणारे नुतन युवक पदाधिकारी वेळ देण्यात आला.
शिंदे साहेब म्हणाले तुम्ही काळजी करू नका सोलापूरतील प्रत्येक घाडामोडीवर बारकाईने लक्ष आहे. सत्तेच्या बाहेर असलो तरी सोलापूर विकासाचे काय करता येईलते आपण तर करतच आहोत. युवक हेच काँग्रेस पक्षाची ताकद आहे.
आगामी महापालिका निवडणूक सर्वांनी जोमाने तयारी करावी ज्या भागातून आपण निवडून येऊ शकतो त्या भागात अधिक काम करावे व जे युवक प्रामाणिकपणे युवक कॉंग्रेसचे काम करीत आहेत त्यांनाच निवडणुकीत संधी दिली जाईल. लोकांमध्ये मिसळून अधिक वेळ काम करा लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. पक्षाने मला एवढं मोठं केलं काँग्रेस पक्षाचे आपल्यावर उपकार आहेत.आता काँग्रेस देशभरात सावरत आहे. आगामी काळात देशात कॉंग्रेस पक्षाचे सरकार येणार आहे तर प्रत्येक कार्यकर्त्यांना काँग्रेस मोठा करते त्याचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून काँग्रेससाठी काम करावे अशा सूचना व कानमंत्र शिंदे साहेबांनी युवक काँग्रेसच्या जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना दिला.