- राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.
- वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभाग १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या ( Question bank ) तयार करत आहे, असे सांगितले आहे.
विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या ( Question bank ) सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभाग १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या ( Question bank ) तयार करत आहे, असे सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या ( Question bank ) सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी ( Question bank ) तयार करत आहे.
Question bank अशी मिळवा
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव आणि माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्याकडून प्रश्नपेढी तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढ्यांचा वापर करण्यासाठी https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. विषय निहाय प्रश्नपेढ्या ( Question bank ) तयार होतील, तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी @scertmaha तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात येत आहेत.या प्रश्नपेढ्या https://t.co/Ugilxs0qsF या संकेतस्थळावर तयार होतील; तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks pic.twitter.com/sympWtsgzY
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 15, 2021