Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

राज्यात कोरोनाचा (corona )प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. दिवसागणिक राज्यांत 60 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

याचा परिणाम झाल्याने मध्य रेल्वेच्या (Central Railway) सुमारे 10 प्रवासी गाड्या, 10 मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवासी कमी असल्यानं या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. (trains from Mumbai-Pune to going other major cities of Maharashtra are canceled)

या गाड्या करण्यात आल्या रद्द –

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी- मुंबई हमसफर / दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर-पुणे, दादर – शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अशा गाड्या रद्द करण्यात आल्या. गाड्या तोट्यात चालत असल्याने रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.

विशेष गाड्या रद्द –
खालील विशेष रेल्वेगाड्या कमी प्रतिसादामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
1).ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मनमाड विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
2) ट्रेन क्रमांक 02110 मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
3). ट्रेन क्रमांक 02113 पुणे – नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 4).ट्रेन क्रमांक 02114 नागपूर – पुणे विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 09.05.2021 पर्यंत रद्द 5).ट्रेन क्रमांक 02189 मुंबई – नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द 6 ) ट्रेन क्रमांक 02190 नागपूर-मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 7) ट्रेन क्रमांक 02111 मुंबई – अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
8) ट्रेन क्रमांक 02112 अमरावती मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
9) ट्रेन क्रमांक 02271 मुंबई – जालना विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 10) ट्रेन क्रमांक 02272 जालना मुंबई विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *