पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर एलसीबी कडील पथकाने मागील काही दिवसापूर्वी मौजे कुमठे ता. अक्कलकोट येथील बोटी ( जलयान ) वर अवैध वाळू उपषावर कारवाई करत एकूण 3 लाख 37 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली होती.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे आष्टे ता. मोहोळ जि. सोलापूर येथील सीना नदीच्या पात्रातून काही इसम यारी मशिनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह मौजे आष्टे ता. मोहोळ जि. सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशिन जोडून सिना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून वाळू उपसा पाॅंईंटची खात्री झाल्यानंतर पाॅंईंट पासून काही अंतरावर असलेल्या पिकामध्ये मध्यरात्री पोहचून पिकात पथक दबा धरून बसले असता पहाटेच्या सुमारास काही वाहने वाळू भरण्यासाठी पाॅईंटवर आले व वाळू भरून निघण्याच्या तयारीत असताना 12 इसमांना गराडा घालून पकडले व काही इसम पळून गेले.
हे आहेत संशयित आरोपी…
1) संतोष ब्रम्हदेव आरकिले वय 35 रा. शेगांव दुमाला ता. पंढरपूर जि. सोलापूर, 2) समीर लक्ष्मण माशाळ, वय 25 रा. आष्टे ता. मोहोेळ जि. सोलापूर, 3) रामचंद्र अर्जून नरोटे वय 20 वर्षे रा.आष्टे ता. मोहोळ जि. सोलापूर, 4) समाधान शे कप्पा शिवशरण वय 26 5) आप्पा श्रीरंग मोरे वय 46 रा. नजीकपिंपरी ता. मोहोळ जि. सोलापूर 6) दिनकर अंबादास वाघमोडे, वय 25 रा. नजीकपिंपरी ता. मोहोळ जि. सोलापूर 7) विलास हुकूम वाघमोडे वय 30 8) सदाषिव महादेव वाघमोडेे वय 45 9) पोपट शिवाजी वाघमोडे वय 21 , 10) बजरंग षिवाजी मोरे वय 52 , 11) उत्तम बलभिम वाघमोडे वय 50 अ.नं 4 ते 11 सर्व रा. नजीक पिंपरी ता. मोहोळ जि. सोलापूर 12) दत्तात्रय प्रल्हाद चव्हरे वय 40 रा. मोहोळ 13) बापू खरात रा. आष्टे ता. मोहोळ, 14) राहूल खरात, 15) वाहन मालक अच्युत गायकवाड रा. मोहोळ, 16) सिकंदर धोत्रे रा. मोहोळ, 17) दीपक बाळासाहेब झेंडगे रा. मलकाची हिंगणी ता. मोहोळ जि. सोलापूर
वाळू पाॅईंटच्या ठिकाणाहून 1 ट्रॅक्टर, यारी मशिन संच, 05 हॅड्रोलिक टेम्पोट्रक असे एकूण 35 लाख 03 हजार 200 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर बाबत मोहोळ पोलीस ठाणे गुरंन 00/2021 भादविकाक 379, 34 पर्यावरण कायदा 1986 चे कलम 9 व 15 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.