Breaking | सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

  1. कोव्हीड विरोधात लढणाऱ्या जिल्हाधिकारी शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

कोरोनाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढून सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी गेल्या दहा महिन्यापासून शर्थीचे प्रयत्न करणा ऱ्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व सोलापूर जिल्हावासियांनी मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करून कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करावे. स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.

गत वर्षातील जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सोलापुरात रुजू झाले. सोलापुरात जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्याचा अवघ्या महिनाभरातच सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. गेल्या दहा महिन्यांपासून त्यांनी सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वारंवार प्रशासनासोबत बैठका घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करून योग्य ते मार्गदर्शन केले.

त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाला नियंत्रणात पाण्यात जिल्हाधिकाऱ्यांना यश मिळाले. गत वर्षातील ऑक्टोंबर महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात करून  पुन्हा सोलापूर जिल्ह्याच्या सेवेत ते व्यस्त झाले.आता पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.