Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर शहरात आदेश लागू

        सोलापूर, दि.2 : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 2 जुलैच्या रात्री बारा वाजेपासून ते 17 जुलै 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी जारी केले आहेत.

            या आदेशानुसार शस्त्रे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती  विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

            तसेच 3 जुलैच्या रात्री बारा वाजेपासून 17 जुलै 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत मिरवणुका काढणेस, सभा घेणेस पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहणार आहे.

            हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात, तसेच लग्न, अंत्ययात्रा यांना लागू नाही. सक्षम पोलीस प्राधिकरणाने दिलेल्या पूर्वपरवानगी घेतली असल्यास हे आदेश लागू होणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *