Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

केंद्र सरकारच्या विरोधात सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
महागाईच्या विरोधात आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे जनतेचे जीवन असह्य झाले आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा उद्रेक म्हणून आंदोलन हाती घेत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली “एकच लक्ष मोदी सरकार विरुध्द एक कोटी साक्ष” राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने “स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ” आज रोजी नवल पेट्रोल पंप येथे सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोलापूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद दादा भोसले, युवक कार्याध्यक्ष युवराज जाधव, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, तिरूपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, दाऊद नदाफ, प्रतिक अबुटे, विवेक इंगळे ,शाहू सलगर, महेश लोंढे, संजय गायकवाड, अभिषेक गायकवाड, आशितोष वाले, भीमा पेदे, भगवान करगुळे, मोनेश घंटे, धम्मा झगझाप, विनायक भंडारे, भीमा बज्जर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार देशातील महागाई वाढण्यास कारणीभूत आहे, पेट्रोल-डिझेल बरोबरच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे जनतेचे जीवन असहाय्य झाले आहे, याविरोधात महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने स्वाक्षरी मोहीम आयोजित केली आहे त्या अंतर्गत सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने दोन लाख सह्या गोळा करण्यात येऊन प्रदेश युवक काँग्रेसच्या एकच लक्ष मोदी सरकार विरुद्ध एक कोटी साक्ष अंतर्गत  पंतप्रधान नरेंद्र मोदी व  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येऊन पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरुद्ध जनतेचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येणार असून ताबडतोब दरवाढ कमी करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *