सोलापुरात 23 जून पासून लस मिळण्यास विलंब लागत आहे. याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरलेली आहे. सात ते आठ दिवसानंतर एकदा लस उपलब्ध होत असल्याने लोक प्रतिनिधी पासून लसीकरण केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. उद्या सोलापुरातील या केंद्रावर लसीकरण होणार आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.