सोलापूर : मार्च 2020 पासून राज्यात कोरोना महामारीचा प्रलय सुरु असून यामध्ये लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर 188 कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे सदर युवकांना नोकरीच्या ठिकाणी, पासपोर्ट व सर्वच ठिकाणी चारित्र पडताळणीच्या वेळी गुन्हेगार असल्याचे दर्शवून अडथळा होत आहे. सोलापूरातील तरुणांना नोकरीच्या वेळेस यामुळे मोठी अडचण होत असून नोकरीमध्ये निवड झालेल्या तरुणांना नोकरी गमवावी लागली आहे.यामुळे विद्यार्थ्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली तर आमदार प्रणिती शिंदे यांनी यावर मुख्यमंत्र्यांकडे मागणीचे निवेदन केले असल्याची माहिती देण्यात आली आहे
खरेतर कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून या काळात जीवनावश्यक गरजांकरीता घराबाहेर पडलेले तरूण हे निश्चितच सराईत गुन्हेगार, दंगेखोर नाहीत परंतू त्यांना या भयंकर नाहक समस्येला सामोरे जाव लागत आहे. राज्यात अशाप्रकारे गुन्हे दाखल झालेले लाखो तरुणांचे करीयर, भविष्य उध्वस्त होईल की काय ? अशी भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात चि. कुणाल खंदारे, चि. राकेश कुरापाटी व इतर विद्यार्थ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदन देवून याप्रश्नी मदत करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे साहेब, गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री, श्री. सतेज पाटील यांच्याकडे आपण अत्यंत सहानुभुतीने या प्रश्नी लक्ष घालून विद्यार्थी, बेरोजगार, नोकरीच्या शोधातील उमेदवार युवा-युवतींवर दाखल 188, 269, 336 कलमाचे गुन्हे त्वरीत मागे घेण्याकरीता तात्काळ धोरणात्मक निर्णय घेण्यात येवून तरुण पिढीला गुन्हेगार म्हणून नोंदलेला डाग पुसुन दिलासा द्यावा अशी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
Leave a Reply