Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

देऋब्राचा यावर्षीचा ल.गो. काकडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांना जाहीर; सोमवारी वितरण

देशस्थ ऋग्वेदी ब्रााहृण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरूकार कै. ल.गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यावर्षी माजी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी दिली आहे. हा कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून आणि मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.

पुरस्कार वितरण समारंभ सोमवार 16 ऑगष्ट 2021 रोजी दत्त चौकातील समर्थ संकुलातील संस्थेच्या श्री समर्थ सभागृहात सकाळी 11 वाजता  सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोळकर हे असणार आहेत. पाच हजार रुपये रोख, संशोधक शिष्यवृत्ती, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संंस्थेतर्फे गेल्या 14 वर्षापासून संस्थेचे संस्थापक तसेच कल्पतरु आणि आनंदवृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकांचे संपादक कै. ल. गो. तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.

यापूर्वी कै. अरुण रामतीर्थकर, अरुण खोरे, अविनाश कुलकर्णी, रमेश महामुनी, एजाज हुसेन मुजावर, विजयकुमार पिसे, शांतकुमार मोरे, दत्तात्रय आराध्ये, प्रशांत जोशी, रजनीश जोशी, राजा माने, अभय दिवाणजी, श्रीकांत कांबळे, संजय पाठक व विक्रम खेलबुडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेतर्फे सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहायक संचालक सुनिल शिनखेडे यांना कविवर्य स्व. दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कारही केला जाणार आहे, असेही डॉ. येळेगावकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळात 2 ऑगस्ट 1939 रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या देशस्थ ऋग्वेदी ब्रााहृण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे 75 हजार रुपयांचे अर्थसहाय्य तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. याशिवाय वधू-वर सूचक मंडळ, गुणीजनांचा सत्कार, स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्यांचे मार्गदर्शन, लहान मुलांसाठी पाठांतर स्पर्धा, परिसंवाद, सामुदायिक मौजी बंधन, रक्तदान शिबीर, स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर,महिला मेळावा इत्यादी उपक्रम नियमित आयोजित केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *