धक्कादायक | माढ्यात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ ; एक जणाचा मृत्यू

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी

सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे . जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर होत असताना दिसत आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोरोनाचा प्रकोप टाळावा असे आवाहन वारंवार प्रशासनाकडुन केले जात आहे.

आज माढा तालुक्यात 74 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर एक जणाचा मृत्यू झाला आहे.दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयातून बरे होऊन 22 जण घरी परतले आहे. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.शिवाजी थोरात यांनी सांगितले. त्याच बरोबर नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे व धोका टाळावा त्याचबरोबर नियमांचे पालन करावे व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

आज दिनांक 3/4/2021 वार शनिवार या गावातील रूग्णवाढ झाली आहे – माढा 3, कुर्डुवाडी 3, टेंभुर्णी 16, बीटरगाव 1, तांदुळवाडी 2, रिधोरे 2, बारलोणी 1, भोसरे 5, चिंचगाव 2, विठ्ठलवाडी 1, तडवळे 1, उपळाई बु 1, चिंचोली 1, वडाचेवाडी तम 1, लोंढेवाढी 1, मोडनिंब 2, घाटणे 5, बेंबळे 1, अकोले बु 2, भेंड 3, परिते 1, आहेरगाव 2, पिंपळनेर 4,जाखले 2,वेणेगाव 1,अकोले खु1,कन्हेरगाव 1,फुटजवळगाव 1,सुर्ली 1,म्हैसगाव 1,पिंपळखुंटे1, आलेगाव बु 1 मानेगाव 3, माढा तालुक्यातील या गावात आज रूग्ण वाढ झाली आहे.

मयत झालेली व्यक्ती लऊळ या गावातील असून ते 61 वर्षाचे पुरुष होते. त्यांना 28 मार्च रोजी सायंकाळी गंगामाई हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .उपचारादरम्यान 30 मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.