सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 400कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज शनिवारी 3 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 400 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 275 पुरुष तर 125 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 338 आहे. यामध्ये पुरुष 203 तर 135 महिलांचा समावेश होतो .आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 4672 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4272 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 46 हजार 980 इतकी झाली आहे. यामध्ये 29,303 पुरुष तर 17,677 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.