Rohit Pawar Corona Positive : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाहतोय (.Corona Virus )यामध्ये राज्यातील नेतेमंडळींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. अनेक चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता कर्जत . राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची तब्येत व्यवस्थित असून ते घरीच उपचार घेत असल्याच सांगण्यात आलेय. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली की…
तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!
Leave a Reply