Big9news Network
सोलापूरचे गामदैवत श्री. सिध्देश्वर महाराजांचे यात्रा ही गेल्या ९०० वर्षापासूनची असून सदर यात्रा ही मोठ्या भक्तीभावत संपन्न होतो. गत २ वर्षापासून कोरोना महामारीचे संकट लक्ष्यात घेवून साद्यापध्दतीने यात्रा साजरी करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेवून सिध्देश्वर भक्तांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या सुचनांचे व नियमांचे पालन करून गेल्या वर्षी योगदंड व पालखी घेवून यात्रा साजरा करण्यात आली होती.
परंतु यंदाच्या वर्षी यात्रा येत्या ८ दिवासामध्ये सुरूवात होत असून सदर यात्रा ही योगदंड, पालखी व नंदीध्वजासह यात्रा करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम, खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महायात्रेचे प्रमुख व पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी (पुजारी) यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेवक नागेश भोगडे, नंदीध्वज मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सुदेश देशमुख, बिपीन धुम्मा उपस्थित होते.
Leave a Reply