संजय उर्फ ‘तात्या’उपाडे याच्या MPDA बाबत कोर्टाचा निर्णय

MH13 News Network

संजीव उपाडे यास एमपीडीए अंतर्गत केलेल्या स्थान बदलीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयात रद्दबातल
सोलापूर दि:- संजीव उर्फ संजय नागनाथ उपाडे वय वर्षे 34,रा:- संतोष नगर,बाळे,सोलापूर याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. अंतर्गत पोलीस आयुक्तालय सोलापूर यांनी केलेला स्थानबद्धतेचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय न्यायमुर्ती श्री.एस. एस.शिंदे व श्री.एन. जे.जमादार यांनी रद्द केला.
यात हकीकत अशी की,संजीव उपाडे याचेविरुद्ध सोलापुरातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते. तो गुंडगिरी करून जोरजबरदस्ती करीत होता. त्यामुळे सोलापूर पोलीस आयुक्तालयाने दिनांक 17/5/2021 रोजी संजीव उपाडे यास एम.पी.डी.ए. ऍक्ट अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला होता.

सदर आदेशाविरुद्ध संजीव उपाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एडवोकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत आदेश रद्द होण्याकरिता याचिका दाखल केली होती.याचिकेच्या सुनावणीच्या वेळी पोलिस आयुक्तालयाने ज्या कागदपत्रांच्या आधारावर संजीव उपाडे यांस स्थानबद्द केले आहे, त्या कागदपत्रांच्या प्रती उपाडे यास त्यावेळी देणे बंधनकारक होते,त्यामुळे सदरचा स्थानबद्धतेचा आदेश हा कायदेशीर नसल्याचा युक्तिवाद केला व त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी पोलीस आयुक्तालयाने केलेला स्थानबद्धतेचा आदेश रद्दबातल केला व उपाडे यास तात्काळ कारागृहातून मुक्त करण्याचा आदेश दिला.
यात आरोपीतर्फे एडवोकेट रितेश थोबडे तर सरकार तर्फे जे.पी याज्ञीक यांनी काम पाहिले.