सोलापूर (प्रतिनिधी)
सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी नागपूर येथे गेल्यानंतर सोलापुरातील बाळे येथील शिवाजी नगर येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घर फोडून चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दि.१० ते ११ मार्च रोजी दरम्यान शिवाजी नगर बाळे सोलापूर येथे घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी आशु मोहन चारी (वय-२९,रा.शिवाजी नगर बाळे,सोलापूर) यांच्या सासर्यांच्या अंत्यविधी करिता नागपूर येथे आपले घर बंद करून गेले होते.त्यावेळी कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला.
त्यानंतर घरामध्ये ठेवलेली चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोह.शेख हे करित आहेत.