सद्यस्थितीत सोलापूर शहरातील क्राईम ब्रँच ॲक्शन मोडमध्ये असलेली दिसून येत आहे. दिवसेंदिवस करीत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे समाजकंटकांचे धाबे दणाणून गेले आहेत.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संजय साळुखे, पोलीस उप- निरीक्षक, शैलेश खेडकर व अंमलदार शहरात गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करणेकामी, पेट्रोलींग करीत असताना
अशी मिळाली टीप…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर संजय साळुंखे यांना गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, दोन इसमांकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आहे व ते पिस्तुल घेवुन ते दोघे हैद्राबाद रोड सग्गम नगर येथुन त्याचेकडील ग्रे कलरची कार क्र. एम.एच.१३ बी. एन.८६८० मधुन सोलापूर शहरात येणार आहेत त्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांनी पंचासह हैद्राबाद रोडवरील हॉटेल स्वादचे समोरील विरुध्द बाजूचे मुळेगांव क्रॉस रोडचे बाजुस असलेले लकी सर्व्हिस सेंटरचे पाठीमागील बाजुस सग्गम नगर कडे जाणारे अंतर्गत कच्च्या रोडवर सापळा लावला असता, थोडया वेळाने एक ग्रे कलरची चारचाकी कार, तिचा पासिंग क्र. एम.एच.१३..बी.एन.८६८० मधुन दोन इसम येत असताना दिसले. मिळाले बातमी प्रमाणे कारच्या वर्णनाची तिच्या पासींग क्रमांकाची खात्री झाल्याने, पोलीस स्टाफने त्यांना गराडा घालून जागीच पकडले. त्यांची नावे व पत्ते विचारता, कार चालकाने त्याचे नाव यासीन जब्बार कामतीकर, वय-३२ वर्षे, व्यवसाय-व्यापार,( रा. स्वाद हॉटेल समोरील सग्गम नगर, हैद्राबाद रोड, सोलापूर) व त्याचे शेजारील सिटवर बसलेला समद उर्फ अलीम उर्फ अल्लू मकतुम शेख, वय-३४ वर्षे, व्यवसाय- स्क्रप भंगार व्यापार, (रा. घर नं. ८२३, बाबा कादरी मशीद जवळ उत्तर कसबा, सोलापूर) अशी असल्याचे सांगितले. त्यांना त्यांचेकडील कारचे कागदपत्रांबाबत व मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, ते उडवा- उडवीचे उत्तरे दिली.
पोलिसी खाक्या दाखवताच…
पोलीस उप- निरीक्षक, शैलेश खेडकर यांनी पंचासमक्ष त्यांचे कारची व त्यांची अंगझडती घेतली असता, कार चालक यासीन कामतीकर याच्या पॅन्टमध्ये डावे बाजूस कंबरे जवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल खोचलेल्या अवस्थेत तर उजव्या खिशात दोन मोबाईल आढळले.
दुसरा संशयित आरोपी…
कारमध्ये त्याचे शेजारचे सिटवर बसलेला इसम समद ऊर्फ अलीम उर्फ अल्लू शेख याचे अंगावरील पॅण्टचे उजव्या खिशात ०३ जिवंत काडतूस मिळून आले. पिस्तुल व काडतुसे ही बेकायदा विनापरवाना त्यांनी जवळ बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी पंचांचे समक्ष त्यांचेकडे मिळून आलेले एक देशी बनावटी गावठी पिस्तुल, ०३ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व त्यांचेकडे मिळुन आलेली चारचाकी कार असा एकुण ६,६९.०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
एम.आय.डी.सी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुरनं-७७/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उप-आयुक्त ( गुन्हे/विशेष शाखा) बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुखे, पोलीस उप- निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार, अशोक लोखंडे, शंकर मुळे, राजू चव्हाण, विजय वाळके, संदीप जावळे, संतोष येळे, सुहास अर्जुन, स्वप्निल कसगावडे, संजय काकडे विजय निंबाळकर, यांनी केली आहे.