बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नराधम बापानेच केवळ 16 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारले. ‘त्या’ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना संतापजनक प्रकार उघडकीस आला.
सिकंदराबाद – राजकोट एक्स या रेल्वेमध्ये एक मोठी खळबळजनक आणि माणुसकीला लाज वाटेल अशी घटना उघडकीस आली आहे. नराधम बापाने पोटच्या सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की..
दिनांक 3 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नराधम बापाने केवळ सोळा महिने वय असलेल्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून केला. राहत्या घरी त्याची पत्नी आणि इतर सर्व जण झोपले असताना त्याने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. सदर घटना हैदराबाद मध्ये घडली होती.
त्यानंतर मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीशी संगनमत केले. अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.
त्याने पत्नीशी संगनमत करुन त्याची मृत मुलगी हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचे मुळगावी राजस्थान येथे रेल्वेने घेवून जात होता.
त्याच्या पत्नीने मयत मुलीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती शेजारी ,नातेवाईक, स्थानिक पोलीसांना किंवा इतर कोणास दिली नाही .काही एक माहिती न देता नवऱ्याचा बचाव करण्याच्या उद्देशाने तो गुन्हा दडवून ठेवून मयत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसने घेवून जात होते . सोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवासी यांना संशय आल्याने प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी मयत मुलीचे वडील व मयत मुलीची आई यांचे विरूद कायदेशीर फिर्याद दिली.
त्यामुळे सोलापुर रेल्वे पोलीस ठाणेमध्ये गुन्हा नोंद क्रमांक 01/2022 कलम 302, 201, 376, 377 511, 34 भादवि बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम 6 नुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी दिली.
यामध्ये लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरचा गुन्हा हा केसरा पोलीस ठाणे, जिल्हा रंगारेडडी येथे घडलेला आहे.
श्री सदानंद वायसे पाटील,पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे,
श्री गणेश शिंदे ,अप्पर पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे ,श्री प्रविण चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास सुरू आहे. सदर गुन्हयात आरोपी निष्पन्न झाले असुन गुन्हा उघडकीस आला असल्याची माहिती अमोल गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिली.
Leave a Reply