तर..काका साठेंना महामंडळ द्या ; राजीनाम्यानंतर पहिली मागणी..

Big9news Network

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याला स्वतः काका साठे यांनी दुजोरा दिला आहे.

मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होई पर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर करू नये यासाठी प्रदेश अध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींकडे मुंबईला जाऊन साकडे घालू अशी भूमिका दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी घेतली आहे आणि रात्री ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले.

बुधवारी सायंकाळी काका साठे यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. वयोमर्यादेमुळे सर्वत्र फिरणे होत नाही, त्यामुळे पक्ष कार्याला वेळ देता येईना म्हणून जिल्हाध्यक्ष पदाचा साठे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.मात्र नव्या नेतृत्वाला संधी देण्याची पक्षाची भूमिका असेल तर त्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

मात्र ज्येष्ठ नेते,माजी आमदार राजन पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील,अथवा अन्य कोणत्याही नेत्यांकडे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास काका साठें यांच्या पक्षीय योगदानाचा विचार करून त्यांची एखाद्या महामंडळावर वर्णी लावावी.अशीही मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत,असे डाॅ बगले यांनी सांगितले आहे.