Big9news Network
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन.
कोव्हिड- निमोनियाची गेले 28 दिवस त्यांची झुंज सुरू होती. अनेक दशकं भारतीयांना आणि संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं निधन झाले असल्याची माहिती मिळाली आहे .
ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला .संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे संगीत विश्वातला ध्रुवतारा हरपल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला.