Latest Post

hello world Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापूर शहराचा विकास करण्याबरोबर जनतेने विश्वासाने निवडून दिलेला प्रभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही देत ,आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ आणि प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल आणि या दोन्ही प्रभागातून शिवसेनेचेच सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील ,असा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी व्यक्त केला .
जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुक्रवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी कुटुंबातील सदस्यांनी औक्षण केल्यानंतर सायंकाळी देगाव येथे जनसंपर्क कार्यालयासमोर जिल्हाप्रमुख वानकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवार आणि प्रभागातील नागरिकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला .तसेच देगाव येथे जय भीम चौकाच्या नामफलकाचे उद्घाटन जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि दशरथ कसबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना जिल्हाप्रमुख वानकर यांनी आगामी काळात विकासाच्या कामाबरोबरच शिवसेना बांधणीला महत्व देणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हाप्रमुख वानकर म्हणाले, आतापर्यंत आपण पदाची अपेक्षा ठेवून कोणतेही काम केलेले नाही. केलेल्या कामाचा लेखाजोखा पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पाहत असतातच. शिवसेनेने दिलेल्या पदाच्या माध्यमातून आपण त्या पदाला न्याय देऊन गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना आपल्याला शिवसेनेने आमदारकीचे तिकीट दिले, सोलापूर महापालिकेचे तिकीट दिले, त्यामुळे पक्षाने जे दिले ते स्वीकारत गेलो आणि निष्ठेने काम करत गेलो. या कामाची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या आहेत. सोलापूर शहर आणि हद्दवाढ भाग हा विकसित होत आहे. त्याला ज्या बेसिक अर्थात रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करून महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कशी उंचावेल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. सोलापूर शहराच्या विकासाचा विचार करत असताना आपण ज्या प्रभागातून निवडून आलो त्या प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांच्या विकास कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा मागील पाच वर्षात पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ आणि प्रभाग क्रमांक १० या दोन्ही प्रभागांमध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येऊन दोनही प्रभागात भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी ठामपणे सांगितले.
सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच विविध कमिट्या सुद्धा शिवसेनेच्या होण्यासाठी आपण जिवाचे रान करणार असल्याचे जिल्हाप्रमुख वानकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. प्रभागातील जनतेने आपल्यावर विश्वास टाकल्यामुळे मागील निवडणुकीत आपण आपल्या सोबत असलेल्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणले आहे. आता नव्याने झालेल्या प्रभाग २३ आणि प्रभाग १० मध्ये शिवसेनेच्याच उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वासही जिल्हाप्रमुख वानकर यांनी व्यक्त केला.
ठाकरे घराण्याची निष्ठा हीच वानकर परिवाराची प्रतिष्ठा असून अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेचा भगवा प्रामाणिकपणे फडकवत ठेवू असेही गणेश वानकर यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार विनायक राऊत ,खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील ,आमदार समाधान आवताडे, युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार दिलीप माने, सुनील मधुकरराव चव्हाण, उद्योगपती सतीश वडगबाळकर तसेच प्राध्यापक अजय दासरी, आदींनी वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी झालेल्या सत्कार समारंभास जितेंद्र साठे, अंत्रोळीच्या सरपंच कोमल करपे, शरद निकम, तानाजी गुंड पाटील ,शिवाजी गुंड पाटील, विक्रांत काकडे, अशोक भोसले, मुकुंद जाधव, निवृत्ती भोसले, सिद्धेश्वर कस्तुरे, कारले भाऊजी ,संतोष कोरे, बंडोपंत भोसले ,संतोष सुपाते, दीपक भातलवंडे, संतोष ताडगे,शेखर कवठेकर, विष्णू जगताप, योगेश कोरे, अन्वर शेख ,इब्राहीम शेख, समाधान गायकवाड, गोटू गायकवाड यांच्यासह मानकर परिवारावर प्रेम करणारे प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *