Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार म्हणून ज्यांची ओळख होती असे दिलीप कुमार यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळाचा अस्त झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर भारतीय चित्रपट क्षेत्रातील कोहिनूर हरपला अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

राजकपूर, दिलीपकुमार, देव आनंद या तिघांनी संपूर्ण चित्रपटसृष्टी गाजवली होती. ट्रॅजेडी किंग म्हणून दिलीपकुमार यांची ओळख होती. राम और शाम, यहुदी,मुगले आझम, लीडर ज्वार भाटा, अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले होते. 2000 ते 2006 या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार होते.

पेशावर येथे 11 डिसेंबर 1922 रोजी त्यांचा जन्म झाला होता. 1966 मध्ये सायरा बानू सोबत यांचा विवाह झाला. ज्वार -भाटा या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. बॉलीवूडमधील पहिला महानायक हरवल्याची भावना अनेक चित्रपट सृष्टीतील दिग्गज यांनी व्यक्त केली आहे.

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होता. याआधीही त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता हिंदुजा रुग्णालय मध्ये त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *