ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी साडेसात वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
चित्रपट सृष्टीतील एक मोठे , नावाजलेले अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती.
चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख होती .नया दौर,शहीद, मधुमती, मुगले आजम,देवदास ,क्रांती,कर्मा अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले.