Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News Network

सोलापुरातील विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याची को-जनरेशनची बेकायदेशीर बांधलेली चिमणी पडण्यासाठी सक्रीय प्रयत्न करणारे सोलापूर विचार मंचचे डॉ.संदीप आडके यांनी आठ तारखेला माझा मृत्यू होईल असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यांनी राहत्या घरी आत्मक्‍लेश आंदोलन सुरू केले आहे.

सोमवारी आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालखी मार्गाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील डॉक्टर संदीप आडके यांनी दिलेला इशारा प्रशासनाची झोप उडवणारा आहे.

सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदा बॉयलर प्रदीपन व गळीत हंगाम प्रारंभ करताना केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत खुलासा व सोलापूरचे प्रलंबित होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा त्वरित चालू होण्याबाबत गेल्या रविवार, दि. ३१ ऑक्टोंबर रोजी  संजय थोबडे.डॉ. संदीप आडके.व सोलापूर विचार मंच सदस्य यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात सुद्धा डॉक्टर संदीप आडके यांनी विषण्णता दाखवत  आपली भावना व्यक्त केले होती.

आज शनिवारी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या लेखी पत्रातून त्यांनी बेकायदेशीर चिमणी पाडकामास होत असलेल्या विलंबामुळे आठ नोव्हेंबर रोजी आत्महत्या करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यामुळे सोलापुरातील बुद्धिजीवी वर्गामध्ये मोठी खळबळ माजली आहे.

डॉक्टर संदीप आडके हे सोलापुरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आहे. देशाबाहेर एक तज्ञ डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेले पत्र

 

I have started my agitation against protection of illegal cogeneration chimani of Siddheshwar sugar factory by government of Maharashtra causing obstruction to Solapur hotgi road airport which will end by my death on 8 November 21,during Pandharpur palkhi Marg foundation ceremony by PM Modi ji.
Dr Sandeep Adke .
Solapur.

सोलापूरच्या विकासाला व होटगी रोड विमानतळास बाधा ठरलेल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा को-जनरेशन चिमणीला महाराष्ट्र सरकार वाचवत असल्यामुळे आज पासून मी माझे आंदोलन सुरू केले आहे व त्याचा अंत माझ्या मृत्युने दि. ८ नोव्हेंबर रोजी पंढरपूर पालखी मार्ग उद्घाटन समारंभाच्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व सर्व जग पाहिल.
डॉ.संदीप आडके ,सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *